पालघर पोलीस दलात नवीन गाड्या दाखल झाल्या असून या गाड्यांमुळे पोलीसांच्या गस्त, तपास आणि आपत्कालीन प्रतिसाद कार्यात अधिक गती येणार आहे. नवीन गाड्यांच्या समावेशामुळे गुन्हे प्रतिबंध आणि कायदा-सुव्यवस्थेच्या देखरेखीत मोठी सुधारणा होईल. या गाड्यांचे लोकार्पण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.