भारताचा प्रजासत्ताक दिन हा संविधान, लोकशाही मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरव करणारा पवित्र दिवस आहे. संविधानाने दिलेल्या हक्कांसोबतच कर्तव्यांची जाणीव ठेवून, कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे, शांतता व सुरक्षितता अबाधित राखणे हे आपल्या सर्वांचे सामूहिक कर्तव्य आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळेच एक सुरक्षित, सक्षम आणि समृद्ध भारत घडू शकतो. या प्रजासत्ताक दिनी आपण सर्वजण राष्ट्रप्रेम, शिस्त आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ करूया व देशाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे योगदान देण्याचा संकल्प करूया. या गौरवशाली दिनानिमित्त पालघर पोलीस दल सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे.