जनसंवाद अभियान अनुषंगाने उमरोळी गाव येथे "माहेरवाशीन उमरोळीची" आयोजित कार्यक्रमास हजर राहून उपस्थित महिलांना मा. पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यालयाकडून प्राप्त सायबर गुन्हे जनजागृती बाबत असलेले व्हिडीओ दाखवण्यात आले तसेच महिला अत्याचार, सायबर क्राईम, लैंगिक अत्याचार, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, महिला व बालकांची सुरक्षितता,डायल 112, मूलभूत कायदे तसेच विशेष करून बालविवाह मुक्त भारत विषयावर माहिती दिली. सदर कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य श्रीम. वैदई वाढाण मॅडम, भावना विचारे मॅडम, उमरोळी ग्रामपंचायत पदाधिकारी, तसेच उमरोळी, माहीम, पंचाळी गावचे सरपंच व एकूण 650 ते 700 महिलांची उपस्थिती होती. (विजया गोस्वामी) सहा.पोलीस निरीक्षक केळवा सागरी पोलीस ठाणे