पोलीस दल व नागरिकांमध्ये “फिटनेस की डोस - आधा घंटा रोज” या संदेशाचा प्रसार करणे व फिटनेसला दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनविणे हा हेतू ठेवून दि.24/08/2025 रोजी सायक्लोथॉन उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत भारत सरकारच्या क्रीडा विभागाचे निर्देश झालेले होते. त्याअनुषंगाने श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे निर्देशान्वये पालघर पोलीस दलाकडून दि.24/08/2025 रोजी सकाळी 07.00 वाजता सायक्लोथॉन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.