पालघर जिल्हा पोलीस दलामार्फत नागरिक, विद्यार्थी व युवकांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सायबर गुन्हे, अमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि वाहतूक नियम या विषयांवर विशेष जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत सायबर फसवणुकीपासून बचाव, ऑनलाइन व्यवहारातील खबरदारी, अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे महत्त्व तसेच हेल्मेट, सीट बेल्ट, वेगमर्यादा व वाहतूक नियमांचे पालन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी सजग राहून सुरक्षित समाजनिर्मितीसाठी पोलीस दलास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. “सजग नागरिक – सुरक्षित समाज” पालघर जिल्हा पोलीस दल