८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पालघर पोलीस दलातर्फे पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा! देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीर स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन. देशाची एकता, अखंडता, शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पालघर पोलीस दल सदैव कटिबद्ध आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त पालघर पोलीस दलातील १५ अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या दीर्घकालीन व निष्कलंक सेवेसाठी “अति उत्कृष्ट सेवा पदक” व “उत्कृष्ट सेवा पदक” जाहीर झाल्याने पालघर पोलीस दलाचा गौरव अधिक उंचावला आहे. सुरक्षित पालघर, सक्षम पालघर आणि समृद्ध महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपण सर्वांनी एकजुटीने योगदान देऊया. जय हिंद ! जय महाराष्ट्र !