२१/०६/२०२५ रोजी लायन्स रोटरी क्लब सभागृह, पालघर येथे सकाळी ०७:३० वा. जागतिक योगा दिनानिमित्ताने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेकरीता श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, पोलीस मुख्यालयातील अधिकारी व अंमलदार तसेच सोनोपंत दांडेकर हायस्कूल, पालघर येथील विद्यार्थी उपस्थित होते.