बोईसर पोस्टे हद्दीतील “दारूल उलूम गौसिया चॅरीटेबल ट्रस्ट भैय्यापाडा,सरावली” चे ट्रस्टी श्री रफीक दाऊद शेख यांनी गौसिया मदरसा हॉल येथे सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदरवेळी सायबर क्राईम, आर्थिक गुन्हयाचे प्रकार, अनधिकृत खोट्या कंपन्यांकडून देण्यात येणारी प्रलोभने व होणारी फसवणुक याविषयी सोप्या भाषेत समजावुन सांगितले. तसेच त्यांना दिलेल्या सतर्कते बाबत सूचना व केलेले मार्गदर्शन हे आपले मित्र, नातेवाईक, शेजारी यांना समजावुन सांगून जास्तीत जास्त जनजागृती करावी बाबत आवाहन केले. तसेच पालघर पोलीस वेबसाईट ची माहिती दिली. सदरवेळी उपस्थित सुमारे 700 ते 800 मुस्लीम बांधव उपस्थित होते. (शिरीष पवार) पोलीस निरीक्षक , बोईसर पोलीस ठाणे
No details have been added for this initiative yet.