महाराष्ट्र शासनाचे प्रचलित धोरणानुसार राज्य सरकारी अधिकारी / कर्मचारी यांना रिक्त होणाऱ्या पदामध्ये नियमानुमार पदोन्नती देण्याचे निर्देश आहेत. पालघर पोलीस दलात रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्यासाठी श्री.यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे अध्यक्षतेखाली श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक,पालघर श्रीमती. संगिता शिंदे अल्फोन्सो, पोलीस उप अधीक्षक (गृह) पालघर, कार्यालयीन अधीक्षक,पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर यांची समिती गठीत करण्यात आलेली असून जिल्हयातील पदोन्नतीस पात्र सहायक पोलीस उप निरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस अंमलदार यांची पात्रता व अपात्रता पडताळणी करून एकुण २९ पोलीस अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे .
No details have been added for this initiative yet.