गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय समन्वय बैठक आगामी श्रीगणेशोत्सव व दहीहंडी उत्सव शांततेत, सुरक्षित व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी दिनांक 02/09/2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे जिल्हास्तरीय समन्वय व शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख, अपर जिल्हाधिकारी, अपर पोलीस अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, पोलीस व जिल्हा प्रशासनातील अधिकारी, शांतता समिती व मोहल्ला समिती सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, दहीहंडी आयोजक तसेच पत्रकार उपस्थित होते. बैठकीत कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियमन, मिरवणुकीचे मार्ग, गर्दीचे नियोजन, महिला व बालकांची सुरक्षितता, ध्वनिक्षेपकांचा मर्यादित वापर तसेच सोशल मीडियावरील अफवा व चुकीच्या माहितीबाबत दक्षता याबाबत चर्चा करण्यात आली. सर्व नागरिकांनी परस्परांच्या धार्मिक भावना व परंपरांचा आदर राखून सामाजिक सलोखा व बंधुभाव कायम ठेवत उत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांनी केले. पालघर पोलीस दल उत्सवाच्या काळात शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी सज्ज असून, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. पालघर पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना श्रीगणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
No details have been added for this initiative yet.