आज दिनांक ०७/०६/२०२६ रोजी पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली सायकल स्पर्धा ही आरोग्य, फिटनेस चा संदेश देणारी एक स्तुत्य उपक्रम आहे. या स्पर्धेत विविध वयोगटातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. सायकल चालविणे हा एक उत्तम व्यायाम असून त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक वाहनांचा जास्त वापर करतात. त्यामुळे प्रदूषण वाढते आणि आरोग्यावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत सायकलचा वापर वाढविण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे ठरते. सायकलमुळे इंधनाची बचत होते, पर्यावरण स्वच्छ राहते आणि शारीरिक तंदुरुस्ती टिकून राहते. या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली तसेच युवकांमध्ये क्रीडाभावना आणि शिस्तीचे महत्त्वही अधोरेखित झाले.