“२१ ऑक्टोबर १९५९ — लडाखमधील ‘हॉट स्प्रिंग’ या दुर्गम भागात, भारतीय पोलीस दलातील दहा शूर जवानांनी, देशाच्या सीमांचे रक्षण करताना शौर्यपूर्ण लढा देत वीरमरण पत्करले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजचा दिवस ‘पोलीस स्मृती दिन’ म्हणून संपूर्ण देशभर पाळला जातो.” “हा दिवस आपल्याला स्मरण करून देतो की, पोलीस हे फक्त कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक नाहीत, तर ते राष्ट्राच्या अखंडतेचे आणि सुरक्षेचे बलिदानी प्रहरी आहेत.”