१ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो. १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि तेव्हापासून हा दिवस मराठी अस्मितेचे प्रतीक ठरला आहे. महाराष्ट्र ही संतांची, वीरांची आणि समृद्ध संस्कृतीची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांपासून प्रेरणा घेऊन आपण राज्याच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे. हा दिवस आपल्याला एकात्मता, कर्तव्य आणि राज्यप्रेम यांची जाणीव करून देतो. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पालघर येथे पोलीस विभागाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. ना. श्री. गणेशजी नाईक साहेब, मंत्री (वने), महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, जिल्हा पालघर यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण, परेड आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान असे विविध उपक्रम पार पडले. या सोहळ्यामुळे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना आणि राज्याबद्दलचा अभिमान अधिक दृढ झाला.