सद्रक्षणाय खलनिग्रहणाय... अर्थात सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा विनाश! ज्यांच्या खांद्यावरील खाकी वर्दी केवळ एक पेहराव नसून, १४ कोटी जनतेच्या विश्वासाचे कवच आहे; ज्यांच्या डोळ्यातील सतर्कतेमुळे आपण निर्भयपणे झोपू शकतो, अशा महाराष्ट्र पोलीस दलाचा आजचा दिवस... अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस ! आज २ जानेवारी ! आजच्याच दिवशी, १९६१ साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला त्यांचा 'मानाचा ध्वज' प्रदान केला होता, तो ऐतिहासिक क्षण ! आपल्या तिरंग्याच्या संरक्षणासाठी आणि राज्याच्या शांततेसाठी अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या, ऊन-वारा-पाऊस कशाचीही तमा न बाळगता सण-उत्सवाच्या काळातही रस्त्यावर उभे राहून सेवा देणाऱ्या प्रत्येक पोलीस योद्ध्याला मानाचा मुजरा करण्याचा आजचा हा प्रसंग !