आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पालघर जिल्हा पोलीस दलाच्या सोशल मीडिया लॅबचे उद्घाटन माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, श्री. संजय दराडे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या उपक्रमामुळे नागरिकांशी थेट संवाद साधता येणार असून, तक्रारींचे त्वरित निवारण करणे तसेच पोलीस दलाच्या विविध उपक्रमांची माहिती जलद गतीने जनतेपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेबाबत जनजागृती करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. या उद्घाटनप्रसंगी वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोशल मीडिया शाखेमुळे पोलीस प्रशासन अधिक पारदर्शक होऊन जनतेच्या अधिक जवळ येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.