पालघर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि पोलीस दलाची गतीमानता वाढवण्यासाठी, मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालयाकडून ९ बस आणि जिल्हा नियोजन समिती (DPDC) मधून ३६ वाहने असे एकूण ४५ नवीन वाहने पालघर जिल्हा पोलीस दलास प्राप्त झाली आहेत. या आधुनिक वाहनांचे लोकार्पण महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी मा. ना. श्री. गणेश नाईक, मंत्री (वने), महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, जिल्हा पालघर यांचे शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून पोलीस परेड मैदान कोळगांव येथे करण्यात आले. वाढते नागरीकरण आणि पालघर जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेता, दुर्गम भागातील गस्त आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने पोहोचण्यासाठी या वाहनाचा उपयोग होणार आहे.
No details have been added for this initiative yet.