भारताच्या संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांचा गौरव करत पालघर जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास पालघर जिल्ह्याचे माननीय पालक मंत्री श्री. गणेशजी नाईक साहेब तसेच पालघर जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. माननीय पालक मंत्री व माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत संविधानातील आदर्श आचरणात आणण्याचे आवाहन केले. समाज, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना त्यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या सोहळ्यामुळे गुणवत्तेचा सन्मान तर झालाच, सोबतच देशसेवा, सामाजिक बांधिलकी व जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली. एक प्रगत, सक्षम व समृद्ध पालघर जिल्हा घडविण्याचा संकल्प सर्व उपस्थितांनी या प्रजासत्ताक दिनी केला.