अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम पालघर पोलीस दलाच्या वतीने "Drugs Free Society Campaign" अंतर्गत दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी विराज इंटरनॅशनल स्कूल येथे "Anti Drugs Awareness Session" आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पालघर पोलीस व तारापूर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी व उपस्थितांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम सायबर गुन्हे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अंमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी व सुरक्षित जीवन जगण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही "Say No to Drugs" या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत अंमली पदार्थमुक्त समाज निर्मितीचा संकल्प केला. अमली पदार्थांविरोधात जनजागृती करून युवा पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पालघर पोलीस दलामार्फत अशा जनजागृतीपर उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे.
No details have been added for this initiative yet.