जिल्हा विशेष शाखा

About Us

विशेष शाखेचे कार्य

विशेष शाखा ही जिल्हा पोलीस संघटनेच्या रचनेत अत्यंत महत्त्वाची शाखा आहे. ही शाखा जिल्ह्यात सण, निवडणुका, परीक्षा, व्हीआयपी व व्हीव्हीआयपी भेटीच्या वेळी सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करते व पोलीस ठाण्यांशी समन्वय साधते.

ही शाखा विविध संघटना, चळवळी, व राजकीय पक्षांच्या हालचालींबाबत गुप्त माहिती आधीच गोळा करते. ही माहिती विश्लेषित करून राज्य गुप्तवार्ता विभाग (SID) व संबंधित पोलीस ठाण्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी दिली जाते.

ही शाखा व्यक्तींचे चारित्र्य पडताळणी, पासपोर्ट पडताळणी, ध्वनी प्रदूषणाच्या प्रकरणे व विविध परवान्यांकरिता शिफारस यांसारख्या बाबतीतही काम करते.

विशेष शाखेच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या:

  • गुप्त माहिती संकलन व विश्लेषण
  • जिल्ह्यातील संवेदनशील (महत्त्वाच्या) ठिकाणांची तपासणी
  • Indian Secret Act 1923 चे कलम 8(1) नुसार शहर व जिल्ह्यासाठी निर्बंधित क्षेत्रांचे नियोजन करून संबंधित प्राधिकरणाकडून मान्यता घेऊन शासनास सुपूर्द करणे
  • स्फोटके व शस्त्रगाळ्यांचे नियमित लेखापरीक्षण
  • जिल्ह्यात येणाऱ्या परदेशी व्यक्तींची माहिती संकलन
  • बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांची चौकशी
  • चारित्र्य पडताळणी, पासपोर्ट पडताळणी
  • उपोषण, आत्मदहनाच्या घटनांची माहिती संकलन
  • मोर्चा, संप इत्यादी वेळी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी
  • व्हीआयपी, व्हीव्हीआयपी व महत्त्वाच्या व्यक्तींसाठी सुरक्षा व्यवस्था नियोजन
  • निवडणूक व मोठ्या सण-उत्सवासाठी सुरक्षा व्यवस्था
  • राजकीय पक्ष व त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे
  • आग, स्फोटके इत्यादीबाबत माहिती संकलन
  • गोपनीय अहवाल तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना व शासनाला सादर करणे
  • पूर योजना, आपत्ती योजना, जलपुरवठा कर्मचारी संप योजना, एसटी महामंडळ कर्मचारी संप योजना, महावितरण कर्मचारी संप योजना अशा योजनांचा सराव व पुनर्रचना करणे