पोलीस वाचनालय

पोलीस मुख्यालय पालघर येथे माहे फेब्र. २०१९ पासुन पोलीस कल्याण निधी अंतर्गत पोलीस वाचनालय सुरु करण्यात आले आहे. सदर वाचनालयाची प्रवेश फी पोलीस पाल्यांकरीता प्रत्येकी रु.१००/- आणि इतर विद्यार्थीसाठी रु.३००/- असून वाचनालयचे कामकाज पाहण्यासाठी ०२ पोलीस अंमलदार यंची नेमणुक करण्यात आली आह. वाचनालयामध्ये सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू ही वर्तमानपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. वाचनालयामध्ये एकुण ८२४ स्पर्धा परिक्षा पुस्तके आणि कांदबरी उपलब्ध आहेत. वाचनालयामध्ये एकूण सभासद संख्या ४९० इतकी आहे.