दि. 21.03.2025 रोजी केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील पाम ऑर्चिड रिसॉर्ट येथे केळवा सागरी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांची नागपूर येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने बैठक घेऊन दोन जातीत, समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही तसेच समाजामध्ये शांतता राहील, याबाबत सूचना दिल्या. तसेच सायबर गुन्ह्यापासून होणारी फसवणूक व घ्यावायची दक्षता, वाहतुकीचे नियम पाळणे इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले.